विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; Chandrakant Patil यांचा पुढाकार

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; Chandrakant Patil यांचा पुढाकार

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. (Pune Traffic) वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule University) वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

या बैठकीसाठी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी पाटलांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा, असे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले. तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube