ठाकरेंना हिजड्यांचा प्रमुख म्हणणे राणेंना भोवणार?; पुण्यात तृतीयपंथी समाज आक्रमक…पाहा Video
Pune Transgender Protest: आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. या विरोधात पुण्यामध्ये तृतीय पंथी चांगलंच आक्रमक होत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.आमदार नितेश राणे विरोधात मध्यरात्री पासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (BUNDGARDEN POLICE STATION) बाहेर तृतीयपंथी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
Pune Transgender Protest : आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुण्यात तृतीयपंथी आक्रमक; रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून धरपकड… #PuneTransgenderProtest #MLAnileshrane #PUNENEWS #letsuppmarathi pic.twitter.com/jl86ock9Pk
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 12, 2023
पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीये. पण जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर पुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका यावेळी तृतीयपंथी समाजानी घेतली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी तृतीयपंथी आक्रमक होत रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून या तृतीय पंथीना धरपकड करण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळालं आहे.
मर्दानगी वर कलंक !
हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा..
बायला कुठला!! pic.twitter.com/5Wl37OeS8e
— Nitesh Rane (@NiteshNRane) July 10, 2023
नेमकं काय आहे प्रकरण ?
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे.
Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे मॉर्फ केलेला फोटो ट्विट करत ‘मर्दानगी वर कलंक ! **#च्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!’ अशी जहरी शब्दांत टीका केली होती. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता तृतीयपंथीय समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.