‘आता हिंसक आंदोलन झालं तर…’, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन मोरेंचा थेट इशारा

‘आता हिंसक आंदोलन झालं तर…’, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन मोरेंचा थेट इशारा

Vasant More On Pune Porsche Car Accident Hit: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनची जी धक्कादायक घटना घडली, (Pune Porsche Car Accident) त्यावरुन आता पुण्यात आता चांगलंच राजकारण पेटलं आहे. (Pune Accident) या प्रकरणावरून पुण्यातील नेते एकमेकांनवर टीकेची झोड सोडत आहेत. अशातच आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांनी रोखठोक सवाल केला आहे.

म्हणाले की, कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे, तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. असा थेट इशारा मोरेंनी यावेळी दिला आहे.

पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

फरार बिल्डरला अटक
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे.

बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा

मुलगा अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अडीच कोटींची कार पण, १७५८ रुपये भरलेच नाहीत; विशाल अग्रवालचा नवा कारनामा उघड

कुणाकुणाला झाली अटक

अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी तसेच मुंढवा येथील कोझी हॉटेलचे प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर आणि ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप रमेश सांगळे, जयेश सतीश बोनकर यांच्यासह मुलाचे वडिलांना अटक करण्यात आली आहे.

काय म्हणाले पुण्याचे पोलीस आयुक्त

या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असून, याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे काल (दि.20) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते. तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासात मुलाच्या वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube