दादा, आता आमचाही विचार करा; अजित पवार DCM होताच वसंत मोरेंची पोस्ट
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी (upcoming municipal elections) आरक्षणासह अन्य प्रक्रियेला स्थगिती दिल्यानं गेल्या कित्येक महिन्यापासून महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सध्या महानगरपालिकांवर प्रशासन नेमलेले आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधींना कामे करता येत नाही. दरम्यान, आता मनसेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे (Leader Vasant More) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना यासंदर्भात एक आवाहन केलं आहे. दादा… जरा आता आमचाही विचार करा की, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याचं आवाहन केलंय. (Vasant More appeal to Deputy Chief Minister Ajit Pawar for pune municipal elections)
वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आला आहात. तुमचा पुन्हा राज्याभिषेकही झाला आणि तुम्हाला मनासारखं खातंही मिळालं आहे. आता जरा आमचाही विचार करा की, दादा. घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका, अशी पोस्ट मोरेंनी लिहिली.
वसंत मोरेंची नेमकी पोस्ट काय?
होय दादा एक विनंती करू का? 2021 मध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तुम्ही आणि तुमच्या आधीच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड कष्ट करून पुणे महानगरपालिकेची 3 नगरसेवकांची प्रभाग रचना केली होती, जी आजही कायम आहे. अगदी आरक्षणाची सोडत ही पूर्ण झालेली आहे. निवडणुका तुम्ही घेणारच होता, पण सारं केलेल कष्ट वाया गेले. राज्यात सत्ता बदल झाला. आता परत तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आला आहात. पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय. मनासारखे खातेही मिळाले आहे. जरा आता आमचाही विचार की, दादा. घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका… अशा आशयाची पोस्ट वसंत मोरेंनी लिहिली.
IPL 2023 मध्ये 35 सिक्स मारणारा खेळाडू भारतीय संघात
वसंत मोरे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत मनसेतच आहेत. मनसेचा पुण्यातील फायरब्रॅन्ड नेता म्हणून मोरेंची ओळख आहे. ते सध्या मनसेचे पुणे शहर प्रमुख आणि नगरसेवक आहेत. आपल्या धडाडीच्या कामाच्या शैलीसाठी ते प्रसिध्द आहेत. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच पुणे पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आवाहन केलं. त्यामुळं आता अजित पवार यावर काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.