Video : पुण्यात पुण्याचेच प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न विचारताच पंकजांचा सूर बदलला; म्हणाल्या, टार्गेट…

  • Written By: Published:
Video : पुण्यात पुण्याचेच प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न विचारताच पंकजांचा सूर बदलला; म्हणाल्या, टार्गेट…

पुणे : मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा हे विधान आहे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंकजा मुंडें असं का म्हणाल्या आणि त्यांचा सूर अचानक का बदलला?. (Pankaja Munde Angry After Asking Question On Beed In Pune)

Video : स्वारगेटवरील ‘खळ्ळखट्याक’ वसंत मोरेंच्या अंगलट येणार?; अजितदादांनी दिले संकेत

तर, पंकजा मुंडे पुण्यात आल्या असता त्यांना पत्रकारांनी बीडमधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच पंकजांचा सूर बदलला आणि त्यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्याला फैलावर घेत त्यालाच त्यात काय लिहिले तुम्ही वाचेल का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. पुढे त्या एवढ्यावरच न थांबता म्हणाल्या की, बीडचा विषय मागे पडला आहे. पण तुम्हाला बीडबद्दल प्रश्न विचारण्याचे टार्गेट दिले आहे. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. नांदेडमध्ये घटना घडली असे म्हणत  मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा, असे पंकजा म्हणाल्या.

अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?; शिंदेंच्या विधानावर बोलताना दादांनी घेतलं फडणवीसांचं नाव

…तर तुमच्यावर कोड ऑफ कन्टेपट दाखल करावा लागेल

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नेमकं काय लिहिले आहे ते माहिती नाही जेव्हा माहिती होईल त्यावेळी बोलेल असे त्या म्हणाल्या. दोषारोपपत्रात काय लिहिलं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर, तुमच्यावर कोड ऑफ कन्टेपट दाखल करावा लागेल असेही पंकजा मुंडे यांनी प्रश्न विचारणाऱ्याला ऐकवले. हे सगळं गृह खात्याकडे असतं त्यांना माहिती असेल. देशमुख हत्येविषयी मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले असल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले.

माझ्याकडे गृह खातं नाही

माझ्याकडे गृहखाते नाही. त्यामुळे या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. कारण गृहखाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून या प्रकरणी ते लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल असा विश्वासही यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube