Kasba By Election: 270 मतदान केंद्रासह, निवडणूक यंत्रणा सज्ज
पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे 2 लाख 75 हजार मतदार, 270 मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यासाठी 756 मतदान यंत्र 378 कंट्रोल युनिट व 405 व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमलेल्या मतदान केंद्राकडे ते रवाना होणार आहे .यासाठी पीएमपी कडून 43 मोठ्या बस, 7 छोट्या बस, बारा 12 जीप दिले आहेत. अशी माहिती कसब्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ बारटक्के यांनी दिली आहे.
या पोट निवडणुकीसाठी प्रचारचा कालावधी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपला. कसब्यातून निवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत .यासाठी दोन लाख 75 हजार 428 मतदार ,270 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजानावर आहेत .त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आह. रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आवश्यक तो बंदोबस्त येणार केला आहे.
Nitesh Rane: ठाकरे पिता-पुत्र तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य झाले का ?
एकूण मतदार – 2,75,428
पुरुष मतदार – 1,36,873
महिला मतदार – 1,38,550
तृतीयपंथी मतदार – 5
अनिवासी भारतीय मतदार – 114
दिव्यांग मतदार – 6,570
80 वर्षांवरील मतदार – 19,244
मतदान केंद्र – 270
संवेदनशील मतदान केंद्र – 9
चित्रीकरण करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राची संख्या – 27
मतदानासाठी आवश्यक कर्मचारी – 1,200
क्षेत्रीय अधिकारी- 25
सूक्ष्म निरीक्षक – 11
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाइन सुद्धा देण्यात आलेले आहेत काही लिंक दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत.
– Voter Helpline App
– Pwd App (दिव्यांगांसाठी)
– www.ceo.maharashtra.gov.in
– https://electoralsearch.in