शाकिबने सावरले; लंचपर्यंत बांगलादेशच्या 2 बाद 82 धावा

शाकिबने सावरले; लंचपर्यंत बांगलादेशच्या 2 बाद 82 धावा

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाने उपाहारापर्यंत 82 धावांत बांगलादेशच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहेत. जयदेव उनाडकट आणि रविचंद्रन अश्विनने विकेट घेतल्या आहेत. बांगलादेश संघाने 28 षटकांत 2 बाद 82 धावा केल्या आहेत. शाकिब अल हसन (16) आणि मोमिनुल हक 23 धावा करून धावपट्टीवर आहेत.

टीम इंडियाने या सामन्यात एक बदल केला आहे तर बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मागील सामन्यात सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. 12 वर्षांनंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

टीम इंडिया सध्या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी जिंकून क्लीन स्वीप करू इच्छित आहे. रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा संघाची कमान केएल राहुलकडे आली आहे, ज्याने कर्णधार म्हणून पहिला विजय नोंदवला. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 188 धावांनी विजय मिळवला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube