नऊ वर्षांच्या अतिका मीरने रचला इतिहास; ले मेन्स कार्ट जिंकणारी ठरली जगातील पहिली महिला

नऊ वर्षांच्या अतिका मीरने रचला इतिहास; ले मेन्स कार्ट जिंकणारी ठरली जगातील पहिली महिला

9 year old Atiqa Mir wins at Le Mans kart : ले मेन्स कार्ट इंटरनॅशनल सर्किट (Le Mans kart) या स्पर्धेमध्ये नऊ वर्षीय भारतीय चिमुकली अतिका मीर (Atiqa Mir ) हिने इतिहास रचला आहे. ती इंटरनॅशनल ट्रॉफीमध्ये रेस जिंकणारी जगातील पहिली महिला रेसर ठरली आहे. तिने मायक्रोमॅक्स श्रेणीमध्ये रेस टू जिंकत भारताचे नाव मोठं केलं आहे. लॅंडो नॉरिस कार्टमध्ये चॅम्पियनशिप जिंकणारी अतिका हिची कामगिरी पूर्ण आठवडाभर जबरदस्त राहिली. तिने डेन हॉलंड रेसिंग टीमसाठी ड्रायव्हिंग केलं.

रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी, शिस्तभंग समितीची मोठी कारवाई

अतिका हीची ही पहिलीच रेस होती. या अगोदर तिने कधीही या स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता तरी देखील तिने हा मोठा विजय मिळवला आहे. पात्र पात्रता फेरीमध्ये तिला लॅप न मिळाल्याने ती दहाव्या स्थानावर राहिली तर पात्रता हिट एक या रेसमध्ये तिने चौथा स्थान मिळवलं. त्यामुळे ती सहाव्या स्थानावर गेली परंतु दुसऱ्या ड्रायव्हर सोबत च्या शर्यतीमध्ये ती नवव्या स्थानावर गेली.

‘जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी, धंदे बंद करा’; हाकेंनी कडक शब्दांत दम भरला!

रेस टू मध्ये अतिकाने अत्यंत दमदार कामगिरी केली. लॅप टाइमिंगची एक साखळी बनवत तिने ले मेन्स कार्ट इंटरनॅशनलमध्ये इतिहास रचला. या स्पर्धेमध्ये तब्बल 40 देशांमधील 318 ड्रायव्हर्सने सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मायक्रोमॅक्स या श्रेणीमध्ये तब्बल 36 ड्रायव्हर अतिकाचे प्रतिस्पर्धी होते. यातील अनेक रेसर हे या स्पर्धेत अगोदर विजयी झालेले आहेत. त्यांना देखील मागे टाकत अतिकाने दमदार कामगिरी केली.

तर आपल्या विजयावर बोलताना अतिका म्हणाली की, ही रेस जिंकून मी अत्यंत खुश आहे. यासाठी मी अत्यंत मेहनत घेतली आहे. ज्यामध्ये माझी टीम, डीएचआर, परिवार आणि भारतासह अनेक देशातून माझे चाहते. या सर्वांचा विजया मागे हात आहे. युरोपातील हा माझा पहिला विजय आहे. त्यामुळे पुढे देखील मी ही विजयाची शृंखला अशीच कायम ठेवेल आणि भारताचे नाव उंचावर नेईल. असं ती म्हणाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या