‘जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी, धंदे बंद करा’; हाकेंनी कडक शब्दांत दम भरला!
Laxman Hake : मनोज जरांगे, (Manoj Jarange) फुट पाडण्याचे फालतूगिरी धंदे बंद करा, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी कडक शब्दांत दम भरला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणार्थ लक्ष्णम हाके मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केलीय. जालन्यातून ते माध्यमांशी बोलत होते.
खासदार ओमराजे निंबाळकरांनी सभागृह गाजवलं; प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की कुणासाठी?
लक्ष्मण हाके म्हणाले, कायदा सांगतो की, एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येतं, असं असेल तर मग एक व्यक्ती तीन तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ कसा घेऊ शकतो. समांतर आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीतील हजारो जागा ढापल्या जात आहेत. वेठीस धरल्या जात आहेत. मनोज जरांगे म्हणतात, की धनगर ओबीसीतून वेगळा आहे, पण ओबीसीच्या 27 टक्क्यांमधून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं जातं. असं असेल तर मग धनगर ओबीसीतून बाहेर कसा? मनोज जरांगे, ओबीसीत फुट पाडण्याचे फालतूगिरी बंद करा, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
58 वर्षांपूर्वींचे निर्बंध हटवले! सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात
आम्ही आमच्या ओबीस संरक्षणासाठी अधिकारांची लढाई लढत आहोत. मनोज जरांगे हे कोणाच्या सांगण्यावरुन आंदोलन करीत आहेत. छगन भुजबळांना पुढे करायला आम्हीच भेटलो का, आम्ही गेल्या चाळीस वर्षांपासून चळवळीत काम करीत आहोत. आम्ही काही आमदार खासदारांची पोर नाही. तुमचं आंदोलन बेकायदेशीर आहे हे समजलंयं, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण बेकायदेशीर मागणी जी संविधानात नाही जी होऊच शकणार नाही. हा पॉलिटीकल अजेंडा असून काही नेत्यांच्या आदेशावरुन काम करीत असल्याचा आरोप हाके यांनी यावेळी केलायं.
जालन्यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबतच्या अनेक जाहीर सभा झालेल्या आहेत. एखादं स्थळ निवडण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. दंगली घडवून आणायचा हा ओबीसी समाजाचा इतिहास नाही. आम्ही कोणाचे घरे जाळले नाहीत. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बसून आम्ही अर्वाच्च भाषा वापरलेली नाही. तुम्ही खुलेआम मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना शिव्या देता, असंही हाकेंनी स्पष्ट केलंय.