रहाणे-शार्दुलची एकाकी झुंज, 296 धावांवर टीम इंडिया ऑलआऊट

रहाणे-शार्दुलची एकाकी झुंज, 296 धावांवर टीम इंडिया ऑलआऊट

WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला आहे. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली आहे. (WTC Final 2023: Team India bowled out for 296 in reply to Australia’s 469, Rahane and Shardul hit fifties)

भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. याशिवाय शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावले. तर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याचवेळी मिचेल स्टार्क, स्कॉट बाउलँड आणि कॅमेरून ग्रीन यांना 2-2 यश मिळाले. नॅथन लायनने 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 469 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताचे केवळ 2 फलंदाज 50 धावांचा आकडा पार करू शकले. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावली. तर रवींद्र जडेजाने 48 धावांचे योगदान दिले.

Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग

152 धावांच्या स्कोअरवर केएस भरतच्या रूपाने भारतीय संघाला सहावा धक्का बसला होता. केएस भरत पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यावेळी टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी 118 धावा करायच्या होत्या. त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी निराश केले नाही. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यात सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी झाली.

विशेष म्हणजे नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 76 धावांत ३ गडी गमावून संघर्ष करत होता, मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 285 धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. .ट्रॅव्हिस हेड 174 चेंडूत 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 1 षटकार मारला. तर स्टीव्ह स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची शानदार खेळी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube