Gautam Adani : अंबानी पाठोपाठ ‘अदानी’ही क्रिकेटच्या मैदानात; खरेदी केला क्रिकेट संघ

  • Written By: Published:
Gautam Adani : अंबानी पाठोपाठ ‘अदानी’ही क्रिकेटच्या मैदानात; खरेदी केला क्रिकेट संघ

नवी दिल्ली : आयपीएल (IPL) ही क्रिकेट (Cricket) विश्वातील सार्वधिक गाजलेली स्पर्धा आहे. पुरुष स्पर्धेनंतर लवकरच बीसीसीआयकडून (BCCI) महिलांची आयपीएल (Womens IPL) स्पर्धाही खेळवली जाणार आहे. महिला आयपीएल २०२३ या स्पर्धेसाठीच्या संघांचा लिलाव पूर्ण झाला आहे. महिला आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार नुकतेच विकले गेले आहेत. गेल्या आठवड्यात माध्यम अधिकारांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर आज महिला संघांचा लिलाव करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani) यांनी टीम खरेदी केली आहे. अदानी यांनी अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे आणि हा भारताचा सर्वात महागडा संघ ठरला आहे.

महिला आयपीएलच्या यंदाच्या पहिल्या पर्वात एकूण ५ संघ सहभागी होतील. ज्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ आणि दिल्लीचा समावेश आहे. सर्वच संघांसाठी शेकडो कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये अहमदाबादचा संघ सर्वात महागडा ठरला तर लखनौच्या संघासाठी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स कंपनीने सर्वात कमी ७५७ कोटी रुपये मोजले.

अहमदाबादच्या संघासाठी सर्वाधिक १२८९ कोटी रुपयांची बोली

बीसीसीआय कडून ट्विटरवर जाहीर केलेल्या माहितीनुसार अहमदाबादचा महिला आयपीएल संघ अदाणी स्पोर्ट्सलाईन ग्रुपने १२८९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. तर बंगळुरूचा संघ रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ९०१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे.

मुंबईचा संघ खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ९१२.९९ कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. दिल्लीचा संघ जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ८१० कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केला आहे. तर लखनौ संघासाठी कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने ७५७ कोटी रुपये मोजले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube