विनेशला रौप्य पदक द्या, अन् नियमांत बदल करा; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याची मागणी
Jordan Burroughs Demand Give silver medal to Vinesh : पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आले आहे. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत विनेशचा सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिच्याशी होणार होता. मात्र विनेशला वजन वाढल्यामुळं अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर देशभरातील क्रीडाप्रेमींचा पाठिंबा विनेश फोगटला मिळत आहेत. आता ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जॉर्डन बरोज (Jordan Burroughs) हा देखील विनेशसाठी मैदानात उतरला.
बांगलादेशात जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं; सलमान खुर्शीद यांचा खळबळजनक दावा
जॉर्डन बरोज याने विनेशला नियम बदलून विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी UWW कडे केली आहे. त्याने X वर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून विनेशला पाठिंबा दिला.
मविआत कोणीही छोटा भाऊ, मोठा भाऊ नाही, तर सीएमपदाचा निर्णय…; पटोले थेटच बोलले
Proposed Immediate Rule Changes for UWW:
1.) 1kg second Day Weight Allowance.
2.) Weigh-ins pushed from 8:30am to 10:30am.
3.) Forfeit will occur in future finals if opposing finalist misses weight.
4.) After a semifinal victory, both finalists’ medals are secured even if…
— Jordan Burroughs (@alliseeisgold) August 7, 2024
जॉर्डन बरोजने एक्सवर एक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने (UWW) आपल्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज अधोरेखित केली. त्याने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाला काही सूचना दिल्या. त्याने म्हटलं की, 1) दुसऱ्या दिवशी 1 किलो वजन वाढले तर सुट मिळावी. 2) वजन मोजमाप सकाळी 8.30 ते 10.30 दरम्यान घेतले जावे 3) भविष्यात फायनलमध्ये स्पर्धक वजन कमी करू शकला नाही तर त्याला पराभूत घोषित करावे.
GIVE VINESH SILVER! 🥈
— Jordan Burroughs (@alliseeisgold) August 7, 2024
याशिवाय, 4) उपांत्य फेरी जिंकल्यानंतर अंतिम फेरीत जाणाऱ्या दोन्ही खेळाडूंची पदके सुरक्षित असावीत. वजनाची पुर्तता करण्यास खेळाडू चुकले तरी… ज्या खेळाडूचे वजन नियमात असेल त्याला सुवर्णपदक दिले जावे, असं जॉर्डनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. म्हणजे फायनलमध्ये गेल्यानंतर जो खेळाडू अपात्र ठरेल त्याला रौप्य आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला सुवर्णपदक देण्यात यावे.
याशिवाय, जॉर्डनने अजून एक ट्वीट करत विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय, असं वाटत असतांनाच विनेश फोगटला ऑल्मिक स्वर्धेतून अपात्र ठरवलं. या मोठ्या निर्णयामागील कारण म्हणजे 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढलं होतं. विनेश फोगटचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा अंदाजे 150 ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे ती अपात्र ठरली. पण विनेशने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी तिला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले.