Asia Cup : अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताशी भिडणार?; जाणून घ्या समीकरण अन् हवामान

  • Written By: Published:
Asia Cup : अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताशी भिडणार?; जाणून घ्या समीकरण अन् हवामान

Asia Cup India Pakistan Final : आशिया चषकात भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरूच असून, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सुपर 4 मध्ये पाकिस्तानसह श्रीलंकेच्या संघाचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती भारत आणि पाकिस्तान संघाच्या अंतिम सामन्याची. मात्र, त्या आधी खरच

पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात भारताशी भिडणार का?

आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत आता फक्त दोनच सामने शिल्लक आहेत. भारत-बांगलादेश सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज (दि.14) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाशी त्याचा सामना होईल.

पाकिस्तान-श्रीलंकेतील सामना रद्द झाल्यास काय?

सुपर 4 मधील पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ आज समोरा समोर भिडणार आहे. परंतु, जर या दोन्ही संघातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. तसेच दोन्ही संघाचा नेट रनरेट बघितला जाईल. या स्थितीत श्रीलंकेचा संघ सरस ठरून त्यांची अंतिम सामन्यात प्रवेश होईल. कारण पाकिस्तानच्या संघापेक्षा श्रीलंकन संघाच नेट रनरेट चांगला आहे.

सुपर-4 की मौजूदा पॉइंट्स टेबल
भारत – 2 मॅच – 4 पॉइंट, 2.690 नेट रनरेट
श्रीलंका – 2 मॅच – 2 पॉइंट, -0.200 नेट रनरेट
पाकिस्तान – 2 मॅच – 2 पॉइंट, -1.892 नेट रनरेट
बांग्लादेश – 2 मॅच – 0 पॉइंट, -0.749 नेट रनरेट

विजय हाच पाकिस्तानसाठी अंतिम सामन्याचा मार्ग

आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात काही केल्या विजय मिळवणे आवश्य आहे. कारण जर पावसामुळे आजचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण दिले जातील आणि श्रीलंका संघ नेट रनरेटच्या आधारावर अंतिम फेरीत सहज प्रवेश करेल. त्यामुळे जर, अंतिम सामन्यात पाकिस्तानला प्रवेश करायचा असेल तर, विजय हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

हवामानाच अंदाज काय?

श्रीलंकेत आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे काही सामने रद्द देखील करावे लागले होते. तर, भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 मधील सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा मोठ्या धावसंख्येने पराभव केला. त्यानंतर आजच्या श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान हवामान कसे असेल असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. हवामानाची माहिती देणार्‍या वेबसाइट्सनुसार, कोलंबोमध्ये आज (दि.14) सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, Accuweather ने दिवसभर आकाशात काळे ढग राहणार असल्याचे सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube