Asia Cup 2025 : भारतासोबत फायनलमध्ये कोण भिडणार? आज होणार निर्णय

आशिया कप 2025 आता अंतिम टप्प्यात. स्पर्धेत केवळ तीन सामने उरले. त्यापैकी एक आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आहे.

Asia Cup 2025 (1)

 Asia Cup 2025 India Finalist : आशिया कप 2025 चा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेत केवळ तीन सामने उरले असून, त्यापैकी एक आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ भारताविरुद्ध अंतिम फेरीत उतरणार आहे. भारताने सुपर फोरमधील दोन्ही सामने जिंकून आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता सर्वांचे लक्ष पाकिस्तान-बांगलादेश या महत्त्वाच्या सामन्याकडे लागले आहे.

पाकिस्तान आघाडीवर?

टी – 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Asia Cup 2025) दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर पाकिस्तान खूपच मजबूतPakistan दिसतो. आतापर्यंत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 25 सामने झाले असून, त्यात पाकिस्तानने तब्बल 20 विजय मिळवले आहेत, तर बांगलादेश (Pakistan Bangladesh Match) केवळ पाच वेळाच जिंकला आहे.

बांगलादेशपेक्षा ताकदवान?

त्याशिवाय, पाकिस्तानकडे साहिबजादा फरहान, फखर जमान, मोहम्मद हरिस आणि सैम अयुबसारखे स्फोटक सलामीवीर आहेत. तर मधल्या फळीत कर्णधार सलमान अली आघा, हसन नवाज, हुसेन तलत आणि खुशदिल शाहसारखे (Cricket) खेळाडू आहेत, जे डाव सावरण्यात तसेच जलद गतीने पुढे नेण्यात पारंगत आहेत. पाकिस्तानची गोलंदाजीही बांगलादेशपेक्षा ताकदवान मानली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानला विजयाचा दावेदार मानले जात आहे.

सुपर फोर स्कोअर

भारत – 2 सामने – 2 विजय – 4 गुण
पाकिस्तान – 2 सामने – 1 विजय – 1 पराभव – 2 गुण
बांगलादेश – २ सामने – १ विजय – १ पराभव – 2 गुण
श्रीलंका – 2 सामने – 2 पराभव – 0 गुण

अंतिम सामना

आशिया कप 2025 चा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आधीच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले असून, आजच्या पाकिस्तान-बांगलादेश सामन्याचा निकाल ठरवेल की भारतासोबत कोणता संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

follow us