Asia Cup : कोहलीचा विक्रम मोडत पहिल्याचं सामन्यात पाकचं नेपाळपुढे ‘विराट’ लक्ष
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात आज पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा सामना होत आहे. त्यात पाकचा खेळाडू बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस रिहर्सल म्हणून बघितले जात आहे.
पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
बाबरकडून कोहलीचा विक्रम मोडित …
आशिया चषकाच्या आजच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 ओव्हर मध्ये 6 विकेटच्या बदल्यात 342 धावांचं लक्ष नेपाळ पुढे ठेवलं आहे. त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकचा कर्णधार बाबर आझमने 131 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचा अक विक्रम झाला. तर त्यामुळे त्याने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. कारण आता आशिया चषका 151 धावांची खेळी करणारा बाबर आझम हा पहिलाच कर्णधार झाला आहे.
Gadar 2 च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट!
दरम्यान भारताबद्दल सांगायचे झाले तर विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस रिहर्सल म्हणून बघितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक सामन्याकडे विश्वचषकाच्या प्रिझममधून पाहिले जात आहे. आशिया चषक ही विश्वचषकाची ड्रेस रिहर्सलही असून, नुकत्याच झालेल्या सामन्यांचा निकाल काय लागला, कोणत्या खेळाडूने काय केले, कोण फ्लॉप ठरले. या सगळ्याची नोंद प्रशिक्षक-कर्णधार-निवडकांच्या डायरीत केली जात आहे.
रोहित शर्मा समोरील आव्हाने नेमकी कोणती?
आता सर्वप्रथम आपण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासमोरील आव्हाने समजून घेऊया. यात पहिलं आव्हान आहे ते, टीम इंडियात सलामीवीर फलंदाजीची जबाबदारी कोण पार पाडणार? चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? यासह शुभमन गिल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल? केएल राहुलच्या फिटनेसचे काय होणार? असे एक न अनेक प्रश्न रोहित समोर असून या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी रोहितकडे नाहीत. त्यासाठी ऑल इज वेल म्हणत रोहित स्वतःला तयार करत आहे.