Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक; नीरू आणि कायनान यांची चमकदार कामगिरी

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र ट्रॅप नेमबाजीच्या अंतिम फेरीत  नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी  सुवर्णपदक जिंकले.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Asian Games 2026

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅप मिक्स्ड नेमबाजीच्या अंतिम फेरीत  नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी सुवर्णपदक जिंकले. नीरु धांडा आणि कायनान चेनाई यांच्या शानदार कामगिरीनंतर भारताच्या नावावर सध्या 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्य पदके आहेत. भारताची एकूण पदकांची संख्या 57 वर पोहोचली आहे. पदक तालिकेत भारत सध्या सातव्या स्थानावर आहे.

वैयक्तिक गटात आधीच विजेतेपद पटकावलेल्या नीरू धांडा (Neeru Dhanda) यांनी बुधवारी ‘ट्रॅप मिक्स्ड टीम’ प्रकारात कायनान चेनाई (Kynan Chenai) यांच्यासह सुवर्णपदक जिंकून आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखला. या भारतीय जोडीने अंतिम फेरीत 34 गुण मिळवून एक नवीन आशियाई (Asian Games 2026) विक्रमही प्रस्थापित केला. कतारच्या मोहम्मद अल-रुमैही आणि रे बासिल यांनी 32 गुणांसह रौप्यपदक मिळवले. याआधीचा 30 गुणांचा आशियाई विक्रम कतारच्याच नावावर होता, जो या वर्षीच्या जानेवारीत नोंदवला गेला होता.

चीनच्या ची यिंग आणि सन युनोंग यांना 23 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरू यांनी आपल्या मोहिमेचा अत्यंत यशस्वीरीत्या समारोप केला. मंगळवारी त्या महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय नेमबाज ठरल्या होत्या. त्याआधी, त्यांनी महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देण्यातही योगदान दिले होते. अशा प्रकारे, त्यांनी एकूण तीन पदके जिंकली.

3 हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त अन् 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक ; तटरक्षक दलाची मोठी कारवाई

follow us