WTC भारताच्या पराभवामागे ‘ही’ मोठी कारणे, पहा केव्हा सामना हातातून निसटला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते, मात्र संपूर्ण संघ केवळ 234 धावांवरच गारद झाला. अशाप्रकारे कांगारूंनी प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम विजेतेपद पटकावले. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाच्या पराभवामागील कारणे आपण पाहू. (australia-beat-india-in-wtc-final-by-209-runs-reason-behind-lost-match-london-oval)
पहिल्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांची दिशाहीन गोलंदाजी
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज 76 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने कांगारूंना अडचणीतून बाहेर काढले. दोन्ही खेळाडूंनी शानदार शतक झळकावले. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजीचे दर्शन घडवले. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांविरुद्ध सहज धावा केल्या. अशाप्रकारे कांगारू संघ पहिल्या डावात 469 धावांपर्यंत मजल मारू शकला.
भारतीय फलंदाजांनी निराशा केली
ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 296 धावांवर कोसळला. रोहित शर्मासह टीम इंडियाच्या अव्वल फळीतील फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावात केवळ अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी भारताला पन्नास धावांचा टप्पा ओलांडला, पण बाकीचे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. परिणामी भारतीय संघ पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा खूपच मागे पडला.
WTC Final : विराट कोहलीचा हा फोटो पाहून तुम्हाला देखील दुःख होईल, पहा पराभवानंतरचे भावनिक फोटो
रवीचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करणे ही चूक होती का?
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवीचंद्रन अश्विनचा समावेश नव्हता. यानंतर प्लेइंग इलेव्हनवर अनेक प्रश्न निर्माण झाले. अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. वास्तविक, उमेश यादवऐवजी अश्विन हा एक चांगला पर्याय ठरू शकला असता, असा या दिग्गजांचा विश्वास होता.
पहिल्या डावातील चुकांपासून टीम इंडियाच्या फलंदाजांनी धडा घेतला नाही.
भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या फलंदाजांनी सहज विकेट्स गमावल्या. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने 49 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 46 धावांचे योगदान दिले. ओव्हलच्या खेळपट्टीने गोलंदाजांना फारशी मदत केली नसली तरी कांगारू गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले.