Sania Mirza : सानिया मिर्झाच अखेरच स्वप्न अखेर अधुर
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने (Sania Mirza) यापूर्वीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. तिने तिची शेवटची ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2023 खेळली, ज्यामध्ये ती मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिचा जोडीदार रोहन बोपण्णा होता. अंतिम फेरीत सानियाचा पराभव झाला. यानंतर मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये स्टेफनी आणि मातोस जोडीने 7-6, 6-2 अशी मात केली. त्यामुळे सानियाच किताब जिंकण्याच स्वप्न मोडलं.
सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांच्यातील अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही भारतीय खेळाडू पहिल्या सेटच्या पहिल्या दोन गेममध्ये थोडे मागे होते पण या दोघांनी पुढचे तीन गेम जिंकून जोरदार पुनरागमन केले.
भारताचे अशा प्रकारे पुनरागमन करताना पाहून ब्राझीलच्या जोडीनेही आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. 54 मिनिटे चाललेला पहिला सेट टायब्रेकमध्ये गेला जिथे राफेल आणि लुइसा 7-6 ने जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा निराश झाले, पण ब्राझीलच्या जोडीने त्याचा पुरेपूर फायदा उठवत दुसऱ्या सेटमध्ये भारतावर वर्चस्व गाजवले. सानिया-बोपण्णा जोडीने दुसरा सेट 2-6 असा गमावला.
पराभवानंतर रोहन बोपण्णाने सानियाला तिच्या चमकदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या, पण यादरम्यान सानियाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. बोपण्णा म्हणाले की, सानियाने देशातील अनेक तरुणांना खेळासाठी प्रेरित केले आहे. बोपण्णा कौतुक करत असताना सानिया भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले.
यावेळी सानियाने माईक धरला आणि सर्वांचे आभार मानले. तसेच विजेत्या जोडीचे अभिनंदन केले. यानंतर ती म्हणाली, माझ्या व्यावसायिक करिअरची सुरुवात 2005 मध्ये मेलबर्नमधून झाली. ग्रँडस्लॅम कारकिर्दीला अलविदा म्हणण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. असं सानिया म्हणाली.