Ind Vs Aus 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला, सामन्यावर भारताची मजबूत पकड

Ind Vs Aus 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला, सामन्यावर भारताची मजबूत पकड

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आठ बाद 233 धावा झाल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाची मॅचवर मजबूत पकड आहे. भारतीय संघाचे स्टार गोलंदाज अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जादुई फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ टिकू शकला नाही आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर कांगारूंची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ऑस्ट्रेलियाची धाव संख्या आठ बाद 233 अशी झाली आहे.

रविचंद्रन अश्विनच्या नावावर विशेष विक्रम
नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आणखी एक विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 100 बळी पूर्ण केले आहेत, अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

‘मुलीच्या हत्येची धमकी आल्यावर बापाला काय वाटलं असेल ?’ Jitendra Awhad यांची भावूक पोस्ट

रवींद्र जडेजाच्या नावे विक्रमाची नोंद
या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजानेही शानदार कामगिरी केली, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण केले आहेत. त्याने कसोटीत 2500 धावा आणि 250 विकेट्स घेतल्या आहेत, रवींद्र जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा क्रिकेटर बनला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube