Balkrushna Akotkar : ‘त्या’ स्पर्धांमध्ये पहिला दिवस पुण्याच्या खेळाडूंनी गाजवला

Balkrushna Akotkar : ‘त्या’ स्पर्धांमध्ये पहिला दिवस पुण्याच्या खेळाडूंनी गाजवला

पुणे : बालेवाडी येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली वयोगटात ११०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे आणि कोल्हापूरच्या उत्कृष्ट कमगिरी करत गाजवला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन किशोर शिंदे, पंच प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते.

बाळकृष्ण अकोटकर म्हणाले की, शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रीया होत आहे. यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूंनी आत्मविश्वासाने  स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितपणे यश मिळेल.

आजचे निकाल :-

  • १७ वर्षाखालील मुले :- ३ हजार मी. धावणे-१) स्वराज जोशी, कोल्हापूर २) हर्षित कदम, कोल्हापूर ३) सचिन भारद्वाज, पुणे

उंचउडी :- १) सार्थक निंबाळकर, शिवछत्रपती क्रीडापीठ २) आदेश धंडाळे, शिवछत्रपती क्रीडापीठ ३) आल्हाद राउत, नागपूर

थाळीफेक – १) स्वराज गायकवाड, पुणे २) पुष्कर माळी, कोल्हापूर ३) सोहम थोरात, कोल्हापूर

  • १७ वर्षाखालील मुली :- थाळीफेक- १) भक्ती गावडे, पुणे २) वेदिका जगताप, पुणे ३) सुनिता दगडे, औरंगाबाद

उंचउडी- १) प्रतिक्षा अडसुळे, कोल्हापूर २) आंचल पाटील, मुंबई ३) दर्शना जाधव, कोल्हापूर

३ हजार मी. धावणे- १) जान्हवी हिरुडकर, नागपूर २) शकीला वसाळे, नाशिक ३) साक्षी भंडारी, पुणे

  • १९ वर्षाखालील मुले :-लांबउडी- १) शहानवाझ खान, मुंबई २) ऋषीकेश देठे, पुणे ३) शुभम गोंडे, पुणे

गोळाफेक :- १) सुभाष चव्हाण, अमरावती २) शरद बागडी, कोल्हापूर ३) आर्यन आघाव, औरंगाबाद

३ हजार मी. धावणे- १) सुजित तिकोडे, कोल्हापूर  २) आदित्य पाटील, कोल्हापूर ३) कुमार जाधव, पुणे

  • १९ वर्षाखालील मुली :- गोळाफेक- १) राजनंदिनी सोनवणे, कोल्हापूर २) किरन नायर, पुणे ३) सुर्याश्री धोंडरकर, नागपूर३ हजार मी. धावणे- १) सानिका रुपनर, सांगली २) गायत्री पाटील, मुंबई ३) आरती पावरा, नाशिक

लांबउडी :- १) कल्पना माडकामी, औरंगाबाद  २) गायत्री कासुल्ला, मुंबई ३) मधुरा खांबे, पुणे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube