बीसीसीआयचा मोठा निर्णय! देशांतर्गत क्रिकेटला मिळणार लूक; ‘या’ पद्धतीने होणार वनडे

बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता डोमेस्टिक वनडे टूर्नामेंटमध्ये प्लेट ग्रुप सिस्टम दिसून येईल.

Ranji Trophy Cricket

Cricket News : देशांतर्गत क्रिकेटच्या बाबतीत भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने हा निर्णय डोमेस्टिक वनडे क्रिकेट टूर्नामेंटसाठी घेतला आहे. या निर्णयानुसार आता डोमेस्टिक वनडे टूर्नामेंटमध्ये प्लेट ग्रुप सिस्टम दिसून येईल. यंदाच्या सिझनमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. या नियमाची सुरुवात दलीप ट्रॉफीपासून करण्यात येणार आहे. दलीप ट्रॉफी येत्या 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळए या स्पर्धेतील एकदिवसीय सामने वेगळ्या पद्धतीने होतील.

TOI च्या रिपोर्टनुसार वनडे डोमेस्टिक टूर्नामेंट यात विजय हजारे ट्रॉफी, सीनियर महिला वनडे ट्रॉफी, अंडर 23 पुरुष स्टेट ए ट्रॉफीमध्ये सर्व संघ चार एलिट आणि एक प्लेट ग्रुपमध्ये समाविष्ट केले जातील. सर्वात खालच्या सहा टीम प्लेट ग्रुपमध्ये असतील. याआधीच्या स्पर्धेत प्रत्येक सीझनमध्ये प्लेट ग्रुपमधून फक्त दोनच संघ पुढील फेरीत जात होते. यानंतर आता एक टीम प्रमोट किंवा रिलिगेट होताना दिसेल.

इतकेच नाही तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि सीनियर महिला टी20 ट्रॉफीमध्ये सुद्धा बीसीसीआयने बदल केले आहेत. नॉकआऊट स्टेजऐवजी सुपर लीग स्टेज फेरी सुरू करण्यात आली आहे. याआधी बीसीसआयने रणजी स्पर्धेत एलीट आणि प्लेट ग्रुप फॉर्मेटमध्ये सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. रणजी ट्रॉफी 2025-26 टूर्नामेंट याच पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 लाही मैदानात असणार?, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत मोठी घोषणा

बीसीसीआयने का घेतला निर्णय

भारतात डोमेस्टिक क्रिकेट सीझनची सुरुवात 28 ऑगस्टपासून होणार आहे. या दिवसापासून दलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहेत. हा सीझन 3 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या महिला वनडे स्पर्धेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे प्रत्येक पातळीवर संघांच्या कामगिरीत सुधारणा होईल तसेच चांगले खेळाडू पुढे येतील. टीम इंडियाला 2026 मध्ये अनेक महत्वाचे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी देखील मिळू शकते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय फक्त पुरुष खेळाडूंसाठी नाही तर महिला खेळाडूंसाठी देखील घेतला आहे. मागील काही वर्षांपासून भारताच्या महिला क्रिकेटमध्ये वेगाने सुधारणा होत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा महिला क्रिकेट संघांना फायदा मिळू शकतो. त्यांच्या कामगिरीत निश्चितच आणखी सुधारणा होऊ शकते असा विश्वास बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटतो.

ICC टी20 रँकिंगमध्ये भारतीयांचा दबदबा, यादीत तब्बल सात भारतीय खेळाडू; वाचा यादी..

follow us