Nagpur Test: सामनावीर जडेजावर ICC ची मोठी कारवाई, बोटाला मलम लावणे पडले महागात
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र जडेजा ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे. यासोबतच जडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एका डिमेरिट पॉइंटचीही भर पडली आहे. 24 महिन्यांच्या कालावधीतील त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी जडेजाने बोटांना मलम लावल्याची ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 46 व्या षटका घडली. जडेजाने मोहम्मद सिराजच्या हातातून मलम काढून बोटांवर लावले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंपासून ते समालोचक आणि चाहत्यांपर्यंत त्याच्यावर हल्ला झाला. अशाप्रकारे त्याचा मॉम लावण्याचा संबंध बॉल टेम्परिंगशी जोडला जात होता.
Navale Bridge परिसरात पुन्हा अपघात; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
यावर मॅच रेफरीनेही जडेजाला प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात जाडेजाने सांगितले होते की हा मलम वैद्यकीय हेतूने बोटांवर लावला होता. जडेजाच्या उत्तराने मॅच रेफरीचे समाधान झाले. यासोबतच बोटांवर मलम लावल्याने चेंडूच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचेही स्पष्ट झाले.