Electra Stumps : आश्चर्यच! आता स्टम्प सांगतील चौकार अन् षटकार; क्रिकेटमध्ये अफलातून स्टम्प्सची एन्ट्री!
Electra Stumps : क्रिकेटमध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत. आताही एक मोठा बदल झाला आहे. नवीन स्टम्प्स दाखल झाले आहेत. या स्टम्पसचं वैशिष्ट्य असं आहे की फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर या स्टम्पवरील लाइट्स चमकतील. इतकंच नाही तर गोलंदाजाने नो बॉल टाकला तरीही लाइट्स लागतील. यामुळे मैदानावरील पंचांचे काम काही प्रमाणात कमी झाले आहे. या स्टम्पला इलेक्ट्रा स्टम्प्स (Electra Stumps) असं नाव देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या टी 20 बिग बॅश लीग स्पर्धेत हे स्टम्प्स दिसले. या स्टम्प्सना वेगवेगळे लाइट्स लावण्यात आले आहेत.
IND vs SA : आज दुसरा सामना! भारतासाठी मालिका विजयाची संधी, आफ्रिकेसाठी करो या मरो
ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग क्रिकेट (Big Bash League) स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत हे स्टम्प वापरण्यात आले. यानंतर आता पुरुषांच्या स्पर्धेतही वापरण्यात येणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच हे स्टम्प वापरण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सामना सुरू होण्याआधी मायकल वॉन आणि मार्क वॉ यांना स्टम्पबाबत माहिती दिली. सामन्यात फलंदाज कोणत्याही पद्धतीने बाद झाला तरी या स्टम्प्सवरील लाल लाईट लागतील. जर फलंदाजाने चौकार मारला तर स्टम्पसवरील विविध लाईट्स लागतील. जर फलंदाजाने षटकार मारला तर स्टम्पवरील विविध लाइट्स वेगवेगळ्या रंगात चमकतील.
जर मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला तर या स्टम्पवरील लाल आणि पांढरे लाइट्स लागतील आणि एक ओव्हर टाकून झाल्यानंतर पुढील ओव्हर सुरू होईपर्यंत या स्टम्पमध्ये जांभळे आणि निळ्या रंगाचे लाइट्स चमकत राहतील. अशी खास वैशिष्ट्ये या स्टम्प्समध्ये देण्यात आली आहे. एकूणच यामुळे क्रिकेटचा थरार अधिकच रंगणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांत या स्टम्प्सचा वापर करण्यात येत आहे. त्यानंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही हे नव्या पद्धतीचे स्टम्प्स लवकरच दिसतील याचीही शक्यता आहे.
Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे