दोस्त दोस्त न रहा…भारताच्या ‘या’ खेळाडूला मित्रानेच लावला लाखो रुपयांना चुना

दोस्त दोस्त न रहा…भारताच्या ‘या’ खेळाडूला मित्रानेच लावला लाखो रुपयांना चुना

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याची (Umesh Yadav)तब्बल 44 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उमेश यादवचा जुना मॅनेजर असलेल्या मित्राने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शैलेश ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उमेशने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जाणून घ्या काय होतं प्रकरण
क्रिकेटपटू उमेश यादवने आपला मित्र आणि माजी व्यवस्थापक शैलेश ठाकरे यांना जमीन खरेदी करण्यासाठी 44 लाख रुपये दिले. हा भूखंड महाराष्ट्रातील नागपूर येथे विकत घ्यायचा होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र यादव यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याऐवजी माजी व्यवस्थापक शैलेश यांनी ही जमीन स्वत:च्या नावावर नोंदवून घेतली. उमेश यादव यांना समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
.
याप्रकरणावर माहिती देताना नागपूरच्या डीसीपी अश्विनी पाटील म्हणाल्या, क्रिकेटपटू उमेश यादवने त्याच्या ओळखीच्या शैलेश ठाकरे याला त्याच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी 44 लाख रुपये दिले होते. मात्र शैलेशने ही मालमत्ता उमेश यादव यांच्या नावावर न करता स्वत:च्या नावावर करून फसवणूक केली. याप्रकरणी आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत विश्वासभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्यवस्थापकाचा शोध सुरू आहे.

मित्रानेच दिला धोका
अधिक माहितीनुसार, उमेश यादव (Umesh Yadav) हे नागपुरातील शिवाजीनगर मध्ये वास्तव्यास आहे. अनेक काळ उमेश भारतीय क्रिकेट संघाचा भाग देखील राहिलेले आहे. भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याने बाहेर व विदेशात सतत खेळण्यास जावे लागते. या कारणाने त्यांनी त्यांचा मित्र शैैलेश दत्ता ठाकरे (रा. मॉडेल स्कुलजवळ, कोराडी) यास व्यवस्थापक म्हणून नोकरीस ठेवले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube