FIFA World Cup अर्जेंटिना सेमीफायनल खेळणार; स्वित्झर्लंड बाहेर
FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2026 च्या क्वार्टरफायनल सामन्यात अर्जिंटिनाने शानदार कामगिरी करत स्वित्झर्लंडचा 3-1 ने पराभव केला आहे.
FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2026 च्या क्वार्टरफायनल सामन्यात अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत स्वित्झर्लंडचा 3-1 ने पराभव केला आहे. या विजयासह अर्जेंटिना फिफा विश्वचषक 2026 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनल सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे.
या सामन्यात अर्जेंटिनाकडून (Argentina) 28 व्या मिनिटाला अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर, जुलियन अल्वारेझ 112 व्या मिनिटाला आणि लौतारो मार्टिनेझने 120 व्या मिनिटाला गोल केला तर स्वित्झर्लंडकडून (Switzerland) डॅन न्दोये 67 व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या अर्जेंटिना 28 व्या मिनिटाला आघाडी घेतली होती. अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर संघा आघाडी मिळून दिली होती मात्र 67व्या मिनिटाला डॅन न्दोयेने गोल करत स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली.
My goodness look at this outrageous goal from Julian Alvarez to win for Argentina in extra time 🤯🤯🤯! #Argentina #ARGSUI pic.twitter.com/U7EsTTK8eR
— The Final Whistle (@Rufus_45) July 12, 2026
त्यानंतर निर्धारित 90 मिनिटांत निकाल लागला नाही आणि सामना अतिरिक्त वेळेत गेला अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाकडून 112व्या मिनिटाला जुलियन अल्वारेझने महत्त्वाचा गोल केला. त्यानंतर 120व्या मिनिटाला लौतारो मार्टिनेझने एक गोल करत अर्जेंटिनाचा 3-1 असा विजय निश्चित केला. या विजयासह अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
रत्नागिरी, धुळे, संभाजीनगरसह ‘या’ जिल्ह्यात आज पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज-