India vs New Zealand : हार्दिक पांड्याला 24 तासांत घ्यावा लागणार महत्त्वाचा निर्णय, अन्यथा…

  • Written By: Published:
India vs New Zealand : हार्दिक पांड्याला 24 तासांत घ्यावा लागणार महत्त्वाचा निर्णय, अन्यथा…

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या आणि त्यानंतर भारतीय संघाला केवळ 155 धावांवर रोखले. न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 29 जानेवारीला होणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील पण त्यासाठी वेळ फारच कमी आहे.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर आता भारताला ट्रॉफी मिळवण्यासाठी दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध मालिका 3 – 0 च्या फरकाने जिंकली. आता टी -20 मालिकेत टीम इंडिया सलग दोन सामने जिंकून अजेय आघाडी घेण्याच्या तैयारीत आहे. हार्दिकला प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत चांगले नियोजन करावे लागेल. पहिल्या सामन्यातील चुका सुधाराव्या लागतील.

हार्दिकला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार

टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची गोलंदाजी शेवटी अत्यंत खराब झाली. धावांच्या लुटीमुळे संघासमोर मोठे लक्ष्य आले. सामन्यानंतर हार्दिकने स्वतः कबूल केले की भारतीय गोलंदाजांनी 20 ते 25 धावा वाया घालवल्या. सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि त्यानंतर खालच्या फळीने चुकीच्या वेळी विकेट गमावल्या, हे टाळावे लागेल. इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि हार्दिक पांड्याला मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

पहिला T20 सामना खेळल्यानंतर भारतीय संघ 24 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी पहिला सामना झाला. रविवारी संध्याकाळी सात वाजता दोन्ही संघ लखनौमध्ये दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरतील. टीम इंडियाने त्यानुसार नियोजन आणि सराव करण्याचा शनिवारचा दिवस आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube