IND vs AUS Day 2 : पटेल- जाडेजाची आठव्या विकेटसाठी दमदार भागीदारी
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस देखील यजमान टीम इंडियाच्या (Team India) नावावर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून अनेक नवे विक्रम केले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यात 8व्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारतीय संघ या कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 7 गडी गमावून 321 धावा केल्या. रवींद्र जडेजा ६६ आणि अक्षर पटेल ५२ धावा करून नाबाद परतला. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाने 144 धावांची आघाडी घेतली.
भारतीय संघाने पहिल्या सत्रात 2 विकेट गमावल्या
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच कर्णधार रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनने सुरुवातीला सावध खेळ करताना धावसंख्येला पुढे नेले. अश्विनने या काळात काही शानदार फटकेही मारले पण 62 चेंडूंचा सामना केल्यानंतर तो 23 धावा करून टॉड मर्फीचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराकडून सर्वांना दीर्घ खेळीची अपेक्षा होती.
चेतेश्वर पुजारानेही तो येताच सकारात्मक पद्धतीने खेळण्याचे संकेत दिले, मात्र 14 चेंडूत 7 धावा केल्यानंतर टॉड मर्फीच्या लेग साइडकडे जाणाऱ्या चेंडूवर त्याने आपली विकेट दिली. येथून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीने उपाहारापूर्वी संघाला आणखी एकही धक्का बसू दिला नाही. पहिल्या सत्राचा खेळ संपला, तेव्हा भारतीय संघाने 3 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या सत्रात कर्णधार रोहितचे शतक
उपाहारानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच, विराट कोहलीने भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला. कोहली केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार मारून कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली, मात्र 20 चेंडूंचा सामना केल्यानंतर तोही 8 धावा करून नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
या सामन्यात 168 धावा होईपर्यंत भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाच्या साथीने संघाच्या पुनरागमनाची सुरुवात केली. दरम्यान, रोहितने कसोटी क्रिकेटमधील आपले 9वे शतकही पूर्ण केले, तोपर्यंत भारतीय संघाने 5 विकेट गमावून 226 धावा केल्या होत्या.
जडेजा आणि अक्षर या जोडीची अप्रतिम कामगिरी
दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने मोठे यश मिळाले, ज्याला कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने 120 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर संघाला 7 वे यशही मिळाले. अवघ्या ८ धावा करणारा केएस भरत लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. इथून सगळ्यांनाच अपेक्षा होती की ऑस्ट्रेलियन संघ भारताला लवकरच गुंडाळेल पण अक्षर आणि जडेजा या जोडीने तसं होऊ दिलं नाही.
रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी दिवसाचा खेळ संपल्यानंतर या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला खूप मजबूत स्थितीत नेले. रवींद्र जडेजा ६६ धावा करून नाबाद खेळत आहे, तर अक्षर पटेलही ५२ धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, कांगारू संघाकडून टॉड मर्फीने 5 तर नॅथन लायन आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी 1-1 विकेट्स घेतल्या आहेत.