IND vs AUS : टीम इंडिया पराभवाच्या छायेत; दुसऱ्या दिवशी अर्धासंघ तंबूत

  • Written By: Published:
IND vs AUS : टीम इंडिया पराभवाच्या छायेत; दुसऱ्या दिवशी अर्धासंघ तंबूत

IND vs AUS 2nd Test Day: अॅडिलेड (Adelaide Test) कसोटीमध्ये भारतीय संघ (India) हा पराभवाचा छायेत गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज दुसऱ्या डावातही तग धरू शकले नाहीत. दुसऱ्या दिवसअखेर भारताचा अर्धासंघ 128 धावांवर तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी आहे. ही आघाडी पार करून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात टार्गेट द्यायचे आहे. परंतु प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत.

इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे जाणार ? ‘सपा’चाही सपोर्ट

रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी ही जोडी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करणार आहे. पंत हा 28 धावांवर, तर नितीश कुमार हा 15 धावांवर खेळत आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 14 विकेट पडल्या आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने एक बाद 86 धावांवर डावाची सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न केला.

एका बाजूला तीन विकेट गेल्यानंतरही ट्रेविस हेडने एक बाजू सांभाळली. केवळ बाजू सांभाळली नाहीतर त्याने जोरदार फटकेबाजी करत धावा काढल्या. त्याने शानदार 140 धावांची खेळी केली. त्याने 141 चेंडूमध्ये 17 चौकार आणि चार षटकार मारले. ट्रेव्हिस हेडने (Travis Head) भारताचा गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पण शेवटी मोहम्मद सिराजने ट्रेविस हेडचा त्रिफळा उडवत त्याला माघारी पाठविले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ झटपट गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. भारताचा पहिला डाव 180 धावांवर संपुष्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 157 धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी, उद्या भरणार अर्ज…

दुसऱ्या डावातही खराब सुरुवात

प्रत्युत्तरात भारताची खराब सुरुवात झाली. सलामीवीर केएल राहुल हा सात धावांवर बाद झाला. त्याला पॅट कॅमिन्सने झेलबाद केले. त्यानंतर यशस्वी जैस्वालही 24 धावांवर बाद झाला. विराट कोहली हा 11 आणि शुभमन गिल 28 धावांवर बाद झाले. कर्णधार रोहित शर्माला पॅट कमिन्स सहा धावांवर बाद झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube