इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे जाणार ? ‘सपा’चाही सपोर्ट

  • Written By: Published:
इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे जाणार ? ‘सपा’चाही सपोर्ट

Mamata Banerjee on India Alliance: लोकसभा निवडणुकीत (Losabha Election) भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेसेनेसह अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन झाली होती. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. पण हरियाणा, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेला महाराष्ट्रात चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता इंडिया आघाडीचे नेतृत्त्वावरून वाद सुरू झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास मी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून इंडिया आघाडीत धुसफूस सुरू झालीय. काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पार्टीने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलाय.


काँग्रेसने दर्शविला विरोध

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या दाव्याशी सहमती दर्शवली नाही. आघाडीचे नेतृत्व सामूहिक सहमतीने ठरवण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केलंय.
आघाडीचे नेतृत्व कोणत्याही एकतर्फी घोषणेने नव्हे तर सामूहिक सहमतीने ठरवावे, असे काँग्रेसने म्हटलंय. आघाडीचे नेतृत्व हा सामूहिक निर्णय असावा आणि सर्व भागीदारांच्या संमतीने निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने इंडिया टु़डेशी बोलताना सांगितले.

Video: मोहम्मद सिराज – ट्रॅव्हिस हेडमध्ये राडा, शब्दयुद्धाचा व्हिडिओ व्हायरल


समाजवादी पक्षाची भूमिका

समाजवादी पक्षाने (एसपी) ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलाय. हरियाणा आणि महाराष्ट्रात सलग निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी आपल्या नेतृत्व कौशल्याने आघाडी मजबूत करतील, असे समाजवादी पक्षाने म्हटलंय. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सपाचे प्रवक्ते उदयवीर सिंह म्हणाले, ‘ममता बॅनर्जींनी अशी इच्छा व्यक्त केली असेल तर इंडिया0 ब्लॉकच्या नेत्यांनी विचार करावा आणि त्यांचे सहकार्य घ्यावे. यामुळे ही आघाडी मजबूत होईल. बंगालमध्ये भाजपला रोखण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला आमचे 100 टक्के समर्थन आणि सहकार्य आहे. राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) या वादाला वेगळी दिशा देत आघाडीचे खरे शिल्पकार लालूप्रसाद यादव असल्याचे सांगितले. आरजेडीचे प्रवक्ते म्हणाल, इंडिया आघाडी ही कोणा एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेवर आधारित नसून सामूहिक ताकदीवर आहे. लालू प्रसाद यादव यांनी या आघाडीचा पाया घातला होता आणि त्यांची दृष्टी ती पुढे नेईल.

इंडिया आघाडीला लोकसभेला, विधानसभा निवडणुकीला अपेक्षित यश मिळालेले नाहीत. त्यात आपने दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी एकसंध राहील का हा प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube