ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत जिंकला; मालिकेत केली 1-1 ने बरोबरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 02T173820.164

भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. (Ind vs SA) या मालिकेतील तिसरा सामना होबार्टमध्ये सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या सामन्याचे नाणेफेक भारताने जिंकले आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना जिंकला आहे.

होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे सूर्यकुमार यादवच्या संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सवर 186 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरच्या नेतृत्वाखालील सर्व फलंदाजांनी भारतासाठी योगदान दिले. यामुळे संघाला 9 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य सहज गाठता आले. यासह, 5 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामना जिंकणारा भारत पहिला देश बनला आहे.

LIVE : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! भारताची प्रथम फलंदाजी, पावसामुळे किती षटकांचा सामना?

follow us