IND vs AUS : मर्फीने टीम इंडियाला चारली धूळ, विराटला 12 धावांवर दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

IND vs AUS : मर्फीने टीम इंडियाला चारली धूळ, विराटला 12 धावांवर दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

IND vs AUS : पहिल्या दिवशी भारताने (Team India) ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांमध्ये संपवला होता. (IND Vs AUS) त्यानंतर दिवसअखेर 1 बाद 77 धावा केल्या होत्या. (India vs Australia) लंचपर्यंत विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधार रोहित शर्माला साथ दिली. (india vs australia 1st test day) मात्र त्यानंतर टॉड मर्फीने भारताची चौथी शिकार करत विराटला 12 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

नागपूरच्या ज्या खेळपट्टीवर रोहित शर्मा वेगवान फलंदाजी करताना दिसला त्या खेळपट्टीवर विराटची बॅट चालली नाही. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या 12 धावा करून विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फीने बाद केले. मर्फीचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि विराटने तो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू एलेक्स कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये गेला.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने भारताला दोन धक्के दिले. त्याने 23 धावा करून सेट होऊ पाहणाऱ्या आर अश्विनला बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला देखली 6 धावांवर बाद करत टीम इंडियाला धूळ चारली. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल शुन्यावर खेळत असलेल्या अश्विनने आज आपले खाते उघडले. त्याने रोहित शर्माच्या साथीने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज भारत आपला पहिला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा काल दिवस अखेर 56 धावा करून नाबाद होता. आज तो आपली ही अर्धशतकी खेळी मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याला साथ देण्यासाठी नाईट वॉचमन म्हणून रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर आला आहे. त्याने अजून खाते उघडले नसले तरी त्याच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube