Ind Vs Aus Test Match : भारताचे टेंशन वाढले, अहमदाबादची पीच पूर्ण हिरवी असण्याची शक्यता
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका ( Boarder- Gavasakar ) सुरु आहे. या मालिकेत सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. याउलट ऑस्ट्रेलियाचा संघ हा आधीपासूनच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. भारत विरुद्ध आस्ट्रेलियाचा हा सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर होणार आहे. जर या सामन्यात भारताची हार झाली किंवा हा सामना ड्रॉ झाला, तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंका संघाची हार किंवा ड्रॉ झाली तरच भारतीय संघ पुढे जाऊ शकतो.
याआधी मालिकेतील तिसरा सामना हा इंदर येथे झाला होता. हा सामना अडीच दिवसातच संपला होता. त्यामुळे मैदानाच्या पीचवरुन जोरदार टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चौथा सामना हा अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. रिपोर्ट्सनुसार दोन पिचेसला कवर करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्या पीचवर सामना होणार हे कळू शकलेले नाही.
पण सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये दोन्ही पीचेसचे फोटो व्हायरल केले जात आहेत. यापैकी एक पीचवर गवत दिसत आहे. यावरुन अंदाज बांधला जात आहे की, हे पीच वेगवान गोलंदांजांसाठी फायद्याचे असणार आहे. या पीचवर सतत पाणी दिले जात आहे व रोलर देखील चालवला जात आहे.
Green Top for real ???? #Ahmedabad #BGT #INDvAUS pic.twitter.com/in4261knkd
— Himanshu (@himmyrao23) March 7, 2023
Seems like a call over which pitch will be used for the fourth Test has not yet been made. They are covering two strips at the moment #INDvAUS pic.twitter.com/DgX6YF9JXA
— Louis Cameron (@LouisDBCameron) March 7, 2023
Is this the one? So so green this… #INDvAUS @cricketnext pic.twitter.com/mrwvXG2ehf
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) March 7, 2023
मालिकेतील चौथा कसोटी सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल, याचा निर्णय सामन्यापूर्वी होणार आहे. अशा स्थितीत खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज लावता येत नाही. याअगोदर 2021 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील दोन कसोटी सामने इथेच खेळवण्यात आले होते. त्यावेळी दोन वेगवेगळ्या पीचवर सामने झाले होते. यापैकी एक सामना केवळ दोन दिवसातच संपला होता.
Swara Bhaskar च्या वेडिंग पार्टी कार्डवर इन्कलाब जिंदाबादचा स्लोगन ‘हे’ आहे कारण…