IND vs PAK: भारताची फलंदाजी मजबूत तर, पाकिस्तानची गोलंदाजी घातक
Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये आज (दि.2) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपरहिट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताची अनुभवी फलंदाजी आणि पाकिस्तानची भक्कम गोलंदाजी पाहण्यास मिळणार असून, सामन्यापूर्वी जाणून घेऊया दोन्ही संघाचा ताकद आणि कमजोरी काय आहे त्याबद्दल. (Asia Cup India Pakistan Match Update)
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याला पावसाचा अडथळा? जाणून घ्या कसं राहणार हवामान
भारतीय संघाची ताकत काय?
रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या तीन आघाडीच्या फलंदाजांनी धुवाँधार फलंदाजी केल्यास भारताला धावा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याचा समावेश आहे. पांड्याची फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघासाठी तो घातक ठरू शकतो. गेल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये तो पाकिस्तान संघासाठी अडचणीचा ठरला आहे. याशिवाय भारतीय संघात बुमराह, सिराज, शमी, हार्दिक, कुलदीप, जडेजा यांच्यासह सर्वोत्तम गोलंदाज आहेत.
भारताची कमजोरी
भारताची मधली फळी टॉप ऑर्डरसारखी मजबूत नाहीये. त्यामुळे टी 20 प्रमाणे सूर्यकुमारला आजच्या सामन्यातही चांगली खेळी करावी लागणार आहे. बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीनंतर प्रथमच वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या सामन्यात दोघांच्या फिटनेसची परीक्षा असल्याप्रमाणे आहे. तर, दुसरीकडे शमी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर प्रदीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचासाठी हा सामना काहीसा टफ असणार आहे.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याला पावसाचा अडथळा? जाणून घ्या कसं राहणार हवामान
पाकिस्तान संघाची स्थिती काय?
भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तान संघातही काही जमेच्या बाजू आहेत. पाकिस्तान संघात शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांच्यासारखे धोकादायक वेगवान गोलंदाजांचा समवेश आहे. ज्याप्रमाणे विराट कोहली भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यामप्रमाणे कर्णधार बाबर आझम त्याच्या संघासाठी ढाल म्हणून काम करत आहे. सध्या आझम उत्तम फॉर्ममध्ये असल्याने तो भारतीय संघासाठी त्रासदायक ठरू शकतो.
पाकिस्तान संघाची कमजोरी काय?
बाबर, रिझवान, इफ्तिखार यांच्याशिवाय पाकिस्तानच्या फलंदाजांना त्यांची ताकद सिद्ध करावी लागणार आहे. मधल्या फळीतील आघा सलमान, सौद शकील, उस्मान मीर या फलंदाजांना फारसा अनुभव नाहीये त्यामुळे गोलंदाजी करताना त्यांची सत्व परिक्षा असणार आहे.
India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात तीन सामने झाले आहेत. हे सर्व T20 सामने आहेत. यातील भारताने दोन सामने जिंकले असून पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम एकदिवसीय सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे हा सामना 89 धावांनी जिंकला होता.