IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याला पावसाचा अडथळा? जाणून घ्या कसं राहणार हवामान 

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याला पावसाचा अडथळा? जाणून घ्या कसं राहणार हवामान 

India vs Pakistan, Asia Cup 2023 : उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हाय होल्टेज सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (India vs Pakistan) रंगतदार असा हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. (IND VS PAK) तसेच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या टीमने आशिया चषकाची सुरुवात जोरदार दणक्यात केली आहे.

पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये नेपाळचा २३८ धावांचा पराभव केल्याचे बघायला मिळाले. या विजयामुळे पाकिस्तानचा आता आत्मविश्वास वाढला असणार आहे. परंतु भारतीय टीम देखील चांगलीच फॉर्मात आहे. दोन्ही संघ विजयासाठी आता मैदानात उतरताना बघायला मिळणार आहे. सध्या कँडीमध्ये उद्या (शनिवारी) पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

तसेच सायंकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यात दाट व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात डकवर्थ लुईस नियमांचा वापर करण्याची शक्यता आहे. एकदिवशीय सामन्याचा निकाल लागण्यासाठी कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणं, महत्वाचे आहे. कँडी येथे शनिवारी 2 सप्टेंबर दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ६० टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताची प्लेईंग 11
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तानची प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube