IND vs PAK Asia Cup : भारत-पाकिस्तान लढतीत पावसाचा ‘खेळ’; आता उद्या उर्वरित सामना
IND vs PAK Asia Cup : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दुसऱ्या सामन्याला पावसाचा फटका बसला आहे. या सामन्याला राखीव दिवस ठेवल्याने हा सामना आता सोमवारपासून (उद्या) खेळविण्यात येणार आहे. आहे त्या परिस्थितीत उर्वरित सामना होणार आहे. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे खेळत आहेत.
Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; शरद पवारांचा घणाघात
पाकिस्तानने नाणफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले होते. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी बेधडक सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजींचा धुलाई केली. परंतु दोघेही अर्धशतके करून बाद झाले. त्यामुळे 24. 1 षटकात दोन बाद 147 धावांपर्यंत भारताने मजल मारली होती. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे खेळत होते. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. परंतु कोलंबोत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक तासानंतर खेळ सुरू करता आला नाही. त्यामुळे शेवटी पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आता उर्वरित सामना उद्या खेळविण्यात येणार आहे.
हा सामना राखीव दिवशी खेळविण्यात येणार असला तरी या दिवसावरही पावसाचे सावट आहे. सोमवारी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या दिवशीही सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल. राखीव दिवसाचा सामनाही रद्द झाल्यास क्रिकेटप्रेमींचा मात्र हिरमोड होईल.
रोहित शर्माकडून षटकार, चौकारांचा पाऊस
पाकचे कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. परंतु आझमचा हा निर्णय रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी चुकीचा ठरविला. दोघांनी पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई सुरू केली. दोघेही आक्रमक पवित्र्यात खेळत होते. शर्मा व गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी शंभर चेंडूत 121 धावांची सलामी दिली. रोहितने 49 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. यात चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर गिलनेहीही 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने तब्बल दहा चौकार मारले.