IND vs PAK : भारत-पाक महामुकाबला आज पुन्हा होणार; जाणून घ्या श्रीलंकेतील पावसाचा अंदाज

  • Written By: Published:
IND vs PAK : भारत-पाक महामुकाबला आज पुन्हा होणार; जाणून घ्या श्रीलंकेतील पावसाचा अंदाज

Asia Cup India Vs Pakistan Match Update : आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानमधील कालचा (दि.10) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असून, ज्या ठिकाणी सामना थांबवण्यात आला होता. तेथूनच आज (दि. 11) सामना पुन्हा खेळवला जाणार आहे. मात्र, आजही पावसाचे सावट असून, पावसामुळे आजचा सामनाही रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आजचा सामना रद्द झाल्यास अंतिम सामन्यात प्रेवेश करण्यासाठी भारतीय संघाला प्रचंड मेहनत करावी लागेल. ()

Novak Djokovic ठरला युएस ओपन चॅंम्पियनचा बादशाह; 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर कोरलं नाव

पावसामुळे 2 सप्टेंबरचा सामना रद्द
यापूर्वी टीम इंडिया आणि पाकिस्तानामधील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर काल या दोन्ही संघामध्ये सुपर 4 मधील सामना रंगणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना अर्ध्यात थांबवण्यात आला. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याने आशियाई क्रिकेट परिषदेने राखीव दिवस ठेवला होता.

कसा असेल आजचे हवामान?
10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना सुरू झाला तेव्हा लख्ख सूर्यप्रकाश होता. पण, भारतीय संघाचा डाव सुरू झाल्यानंतर 25व्या षटकात सुरू झालेल्या पावसाने मुसळधार रूप धारण केले. यामुळे मैदानावरील आऊटफिल्ड मोठ्या प्रमाणात खराब झाली. यामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.
10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये 90 ते 100 टक्के पाऊस अपेक्षित होता. तर, 11 सप्टेंबरला या ठिकाणी 80 ते 90 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. Accuweather नुसार 11 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये 80 टक्के तर, Weather.com ने 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Asia Cup 2023 : थरारक सामन्यात श्रीलंकेने मारली बाजी; बांग्लादेश आशिया कपमधून आऊट

सामना रद्द झाल्यास काय होणार?
भारत पाकिस्तान मधील आजच्या राखीव दिवशी ठेवण्यात आलेला सामना रद्द झाल्यास टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावेल लागतील. अंतिम फेरीत प्रेवेश करण्यासाठी भारतीय संघाला 12 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होणारे सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील.
आजचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिले जातील. त्यानंतर जर टीम इंडियाने श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले तर, एकूण पाच गुण होतील. यानंतर टीम इंडिया सहज फायनलमध्ये पोहोचू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube