IND vs SA : भारताने सामना का गमावला? सूर्यकुमारने सांगितलं धक्कादायक कारण
IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल दुसरा टी 20 सामना (IND vs SA 2nd T20I) खेळवण्यात आला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने दमदार खेळ करत टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. रिंकू सिंहची अर्धशतकी खेळीही व्यर्थ ठरली. या सामन्यातही पावसाने वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे शेवटी डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजून लागले. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारताचा पराभव झाला. सामना हातातून का गेला याचं कारण कर्णधार सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) सांगितलं आहे.
यादव म्हणाला, आफ्रिकेच्या संघाने सुरुवातीच्या 5 ते 6 ओव्हर्समध्येच सामना आमच्या हातातून हिसकावला होता. पहिला डाव संपल्यानंतर मला ही धावसंख्या आश्वासक वाटत होती. मात्र नंतर सगळं उलटंच घडलं. खेळपट्टीवर जा आणि बेधडक फटकेबाजी करा, हा क्रिकेटचा ब्रँड आहे ज्या बाबत आपण बोलत होतो. पावसामुळे मैदान ओले झाले होते. त्यामुळे ही गोलंदाजांसाठी ही परिस्थिती आधिक कठीण होती. त्याचा फायदा आफ्रिकेच्या फलंदाजांनी घेतला, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
IND vs SA : दुसऱ्या सामन्याआधीच टेन्शन! ‘या’ कारणामुळे सामना रद्द होण्याची शक्यता
चेंडू ओला होत होता. त्यामुळे या धावसंख्येचा बचाव करणे कठीण होत चालले होते. भविष्यातही अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या सामन्यातून आम्हाला बरेच शिकायला मिळू शकते. आता आम्ही तिसऱ्या टी 20 सामन्याची वाट पाहत आहोत, असेही यादव याने सांगितले. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने चांगली धावसंख्या उभारली होती. मात्र पावसाचा व्यत्यय आणि ओले झालेले मैदान भारतीय संघासाठी कठीण ठरले. या काही कारणांमुळे सामना भारताच्या हातातून निसटला.
या सामन्यात धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याने अर्धशतकी खेळी केली होती. भारताच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये पावसामुळे खेळ थांबला तेव्हा 19.3 ओव्हरमध्ये 7 बाद 180 अशी धावसंख्या होती. त्यानंतर दक्षिणआफ्रिकेला विजयासाठी 15 ओव्हर्समध्ये 152 धावांचे टार्गेट देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या पाच ते सहा ओव्हर्समध्येच धडाकेबाज फलंदाजी करत सामना फिरवला. रिझा हेंड्रिक्स 49 धावांची खेळी करत मॅथ्यू ब्रिट्झके आणि एडन मार्करम यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी केली.
Ind vs Aus: गुवाहाटीत ऋतुराजचे वादळ ! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत टी-20 त झळकविले पहिले शतक