IND vs SA : तिसऱ्या सामन्यातही पावसाचाच खेळ? जाणून घ्या, हवामानाचा अंदाज अन् पिच रिपोर्ट
IND vs SA 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3rd T20I)आज वाँडरर्स येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताचा पराभव केला. आता तिसरा सामना आज होत आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. त्यामुळे तिसरा सामनाही पावसात वाहून जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, काळजी करू नका. क्रिकेटचाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. या सामन्यात पाऊस शक्यतो व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज आहे.
दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. त्यामुळे संघाचा पराभव झाला. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी भारताला आहे. तिसरा सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स मैदानावर होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
IND vs SA : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स
खेळपट्टीचं गणित काय
या मैदानावर फलंदाजांचा बोलबोला राहिलेला आहे. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहण्यास मिळतो. चेंडू उसळी घेत असल्याने सहज बॅटवर येतो. सुरुवातीला खेळपट्टीवर ओलावा राहत असल्याने गोलंदाजांना मदत मिळते.
या मैदानावर आतापर्यंत 26 टी 20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर तितकेच म्हणजे 13 सामने दोन नंबरवर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. म्हणजेच दोन्ही संघांना समान संधी आहे. पहिल्या डावात या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या 171 राहिली आहे. दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 145 राहिली आहे. म्हणजेच या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा राहिला आहे.
Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे
दुसऱ्या सामन्यात रिंकूचे अर्धशतक पाण्यात
या सामन्यात धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याने अर्धशतकी खेळी केली होती. भारताच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये पावसामुळे खेळ थांबला तेव्हा 19.3 ओव्हरमध्ये 7 बाद 180 अशी धावसंख्या होती. त्यानंतर दक्षिणआफ्रिकेला विजयासाठी 15 ओव्हर्समध्ये 152 धावांचे टार्गेट देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या पाच ते सहा ओव्हर्समध्येच धडाकेबाज फलंदाजी करत सामना फिरवला. रिझा हेंड्रिक्स 49 धावांची खेळी करत मॅथ्यू ब्रिट्झके आणि एडन मार्करम यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी केली.