श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरचा ‘फिल्डिंग’वर फोकस; गिलसह 5 खेळाडू स्लिपमध्ये तयार

IND vs SL Test Series पूर्वी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली आहे. गौतम गंभीर यांनी फिल्डिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले.

IND vs SL स्लिपमध्ये 5 खेळाडूंची जबाबदारी

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून, या मालिकेसाठी टीम इंडीयाने सरावाला सुरुवात केली आहे. कोलंबोमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणावरही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

ब्रँड व्हॅल्यूमध्ये रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे, शाहरुख खान ठरला नंबर-1!

कोलंबोतील एनसीसी मैदानावर भारतीय खेळाडू सराव करतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करताना दिसत आहेत.

स्लिपमध्ये 5 खेळाडूंची जबाबदारी

कसोटी क्रिकेटमध्ये स्लिप क्षेत्ररक्षणाला मोठं महत्त्व असतं. वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बॅटची कड लागल्यानंतर अनेकदा झेल स्लिपमध्ये जातात. त्यामुळे स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूंना अत्यंत सतर्क राहावं लागतं. एक सोपा कॅच जरी सुटली तर त्याची मोठी किंमत संघाला मोजावी लागू शकते.

ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्यासाठी सिब्बलाचा जोरदार युक्तीवाद! आज कोर्टात नेमकं काय घडलं?

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाने स्लिप कॅचिंगवर विशेष मेहनत घेतली आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना स्लिप क्षेत्ररक्षणासाठी तयार केलं जात आहे.

शुभदीप घोष यांच्यावर फिल्डिंगची जबाबदारी

दरम्यान, भारतीय संघाच्या फिल्डिंग कोचपदाची जबाबदारी नुकतीच शुभदीप घोष यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्यावरही मोठी जबाबदारी असणार आहे.

‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’

भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची असून, मैदानावर उतरण्यापूर्वी टीम इंडिया आपल्या प्रत्येक कमतरतेवर काम करत आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या फिल्डिंगची कामगिरीही पाहण्यासारखी ठरणार आहे.

follow us