शानदार, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 86 धावांनी उडवला बांगलादेशचा धुव्वा

शानदार, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 86 धावांनी उडवला बांगलादेशचा धुव्वा

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामनात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बांगलादेशला 86 धावांनी पराभव केला आहे. याचबरोबर भारताने ही मालिका देखील जिंकली आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या 6ओव्हरमध्ये भारताने 41 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या मात्र त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शतकीय भागीदारी करत भारतीय संघाचा स्कोर 221 पर्यंत नेला. रेड्डीने आपल्या डावात चार चौकार आणि सात षटकार मारले तर रिंकूने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या तर रायन परागने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार षटकांत 16 धावा देत दोन बळी घेतले तर तनझिम हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनाही प्रत्येकी दोन – दोन विकेट घेतले आणि रिशाद हुसेनने 55 धावांत तीन विकेट घेतले.

तर दुसरीकडे प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ नऊ गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाला अर्शदीपने पहिला धक्का दिला. इमान 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. कर्णधार नजमुल शांतोला केवळ 11 धावा करता आल्या. लिटन दास 11 चेंडूत 14 धावा करू शकला.

सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते कलासेतू पोर्टलचे उद्घाटन, ‘या’ दिवसापासून कलाकारांच्या सेवेत

त्यानंतर तौहीद 6 चेंडूत 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर रिशादला केवळ नऊ धावा करता आल्या. तंजीम 8 आणि महमुदुल्लाहने 41 धावांची खेळी केली. भारताकडून सात गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि या सर्वांनी विकेट घेतल्या. नितीश आणि वरुणने 2-2 विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube