U-19 T20 WC: भारताने अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर कोरलं नाव

U-19 T20 WC: भारताने अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर कोरलं नाव

पॉचेफस्ट्रूम : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केलीय. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (U19 Women’s T20 World Cup Final) इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे.

आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण इंग्लंड (India vs England) संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं. ज्यानंतर 69 धावाचं माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात 14 षटकात विश्वचषक जिंकला आहे.

120 चेंडूत 69 धावाचं माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी स्फोटक खेळी सुरु केली. एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली 15 धावांवर तंबूत परतली.

सेमीफायनलमध्ये कमाल कामगिरी करणारी श्वेताही 5 धावा करुन बाद झाली. नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा 24 धावा करुन बाद झाली.

पण तोपर्यत भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद 24 धावांच्या जोरावर भारतानं 14 षटकात 69 धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे. .

यापूर्वी 17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या.

अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube