न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा मोठा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यर गोलंदाजांवर नाराज

टीम इंडियाला चौथ्या टी-20 मध्ये मोठा धक्का बसला असून, सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 30T191529.329

India vs New Zealand 4th T20 : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 260 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 172 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 87 धावांनी जिंकला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाराजी व्यक्त केली असून, संघाच्या गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवलं आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. मात्र, या पराभवानंतरही भारताने मालिकेत 3-1 अशी आघाडी कायम राखली आहे.

सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना श्रेयस अय्यरने सुरुवातीच्या षटकांतील गोलंदाजी कमकुवत ठरल्याचं मान्य केलं. पॉवरप्लेमध्ये विशेषतः तिसऱ्या षटकापासून न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर काही भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुरेसा ठरला नाही, असं श्रेयस म्हणाला. यावेळी त्याने न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याच्या खेळीचंही कौतुक केलं. फिलिप्सने काही अप्रतिम फटके मारले असून, संपूर्ण मालिकेतील त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचंही श्रेयसने नमूद केलं.

पुढील सामन्याच्या तयारीबाबत बोलताना श्रेयसने संघाला मिळणाऱ्या विश्रांतीचा उपयोग रणनीती आखण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगितलं. हॅमिल्टनला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना एक दिवसाची विश्रांती मिळणार आहे. या काळात मागील सामन्यातील चुका समजून घेऊन सुधारणा करण्यावर भर दिला जाईल. प्रत्येक मैदानाची परिस्थिती आणि सीमारेषांचं अंतर वेगळं असतं. काही खेळाडू या मैदानावर पहिल्यांदाच खेळत असल्याने त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागल्याचंही त्याने सांगितलं. सुरुवातीच्या तीन सामन्यांत संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे हा पराभव शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग मानून पुढील सामन्यात सकारात्मक दृष्टिकोनातून पुनरागमन करू, असा विश्वास श्रेयसने व्यक्त केला.

टीम इंडियाची प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.

follow us