India आणि Australia यांच्यात पहिला कसोटी सामना आज रंगणार
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना आज नागपुरात खेळाला जाणार आहे. टीम इंडिया या मॅचची सुरुवात विजयाच्या दिशेने करण्याच्या प्रयत्नात असले. पहिल्या दिवशी भारत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाच महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत रोहितने कसोटी मालिकेत शतक झळकावले तर तो एक विशेष आणि मोठी कामगिरी करेल.
दोन्ही संघांनी कसोटी मालिकेसाठी चांगली तयारी केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी सांगितले की, ऑस्ट्रेलियाकडे दोन उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत आणि हे दोघेही फलंदाजांना अडचणीत आणू शकतात हे भारतीय संघाला चांगलेच ठाऊक आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यात आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेची विजयी सुरुवात करायची आहे. अशा परिस्थितीत पहिला सामना जिंकून दोन्ही संघांना मालिकेतील आपली पकड मजबूत करायची आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.