WTC Final, India vs Australia: ट्रेविस हेडचे शानदार शतक, पहिला दिवस ऑस्टेलियाच्या नावावर

  • Written By: Published:
WTC Final, India vs Australia: ट्रेविस हेडचे शानदार शतक, पहिला दिवस ऑस्टेलियाच्या नावावर

WTC Final, India vs Australia:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळाच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) बॅटने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा हेडही पहिला खेळाडू ठरला आहे.(india-vs-australia-travis-head-first-player-to-score-a-century-in-wtc-fina)

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रात 76 धावांवर ऑस्ट्रेलियन संघाने तिसरी विकेट गमावली. येथून ट्रॅव्हिस हेडने स्टीव्ह स्मिथसह डाव वेगाने पुढे नेहला. चहापानाच्या वेळी खेळ थांबला तेव्हा हेडने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. ट्रॅव्हिस हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक अवघ्या 106 चेंडूत पूर्ण केले. परदेशी भूमीवर झळकलेले हेडचे कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक आहे. त्याचबरोबर हेडचे भारताविरुद्धचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक आहे.

WTC Final 2023 : रोहित शर्माचं कसोटी सामन्यांचं अर्धशतक

ट्रॅव्हिस हेड हा क्लाइव्ह लॉईडनंतरचा पहिला खेळाडू ठरला

या संस्मरणीय शतकासह ट्रॅव्हिस हेडने खास विक्रम आपल्या नावे केला आहे. 1975 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू क्लाईव्ह लॉईडच्या नावावर आहे. डावखुरा खेळाडू असल्याने तो सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीलाही उतरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून हेडलाही या सामन्यात शतक झळकावले आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube