16 विकेट आणि 245 धावा; दुसऱ्या दिवशी भारताचं कमबॅक अन् दक्षिण आफ्रिका ‘बॅकफूट’ वर

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाता येथे

  • Written By: Published:
India Vs South Africa

India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाता येथे 14 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) भारताची या सामन्यात पकड मजबूत झाली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी करत दुसऱ्या डावात आफ्रिकेचे सात विकेट घेतल्या आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) 35 षटकांत 7 विकेट गमावून 93 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाने 36 धावांची आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने खराब फलंदाजी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्या दिवशी 27 चेंडूत 12 धावा काढून बाद झाला होता. तर केएल राहुल दुसऱ्या दिवशी अपयशी ठरला, त्याने 119 चेंडूत 39 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर देखील चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 82 चेंडूत 29 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 3 चेंडूत 4 धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा प्रत्येकी 27 धावा करून बाद झाले.

दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताचा डाव 62.2 षटकात 189 धावांवर संपला. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने 4 विकेट घेतले, तर मार्को जॉन्सनने 3 विकेच घेतले. पहिल्या डावात भारताने 30 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पुन्हा खराब कामगिरी केली. सलामीवीर रायन रिकल्टन 23 चेंडूत 11 धावा करून आणि एडेन मार्कराम 23 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.

D. Y. Patil Engineering College : ‘डी. वाय. पाटील अभियांत्रिकी’च्या माजी विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये मेळावा

वियान मुल्डरही 11 धावा करून बाद झाला, तर टोनी डी झोर्झी 2 धावा घेऊन परतला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने 35 षटकांत 7 विकेट गमावून 93 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताकडून रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली. त्याने 13 षटकांत 29 धावा देत 4 विकेट घेतले. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारताने 37/1 अशी मजल मारली होती. तथापि, दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनीही खराब कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी एकूण 16 विकेट पडले, तर दोन्ही संघांनी एकत्रितपणे 245 धावा केल्या.

follow us