IND vs AUS 2025 : शानदार! भारताने जिंकली टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव

IND vs AUS 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने

  • Written By: Published:
IND Vs AUS 2025

IND vs AUS 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. या मालिकेतील पहिला आणि शेवटा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला तर तिसरा आणि चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS 2025) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) स्फोटक फलंदाजी करत 4.5 षटकांत बिनबाद 52 धावा केल्या. अभिषेक शर्मा 13 चेंडूत 23 धावा तर शुभमन गिलेने 16 चेंडूत 29 धावा केल्या मात्र यानंतर पावसाची सुरुवात झाल्याने सामना रद्द करावा लागला.

भारताने 2-1 ने जिंकली मालिका

या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने पाच टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरामध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर दुसरा सामना मेलबर्नमध्ये भारताने गमावला तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सलग चौथा द्विपक्षीय टी-20 मालिका विजय आहे. यापूर्वी, भारताने 2020/21 मध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1, 2022 मध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 आणि 2024/25 मध्ये पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 असे पराभूत केले होते.

भोरमध्ये राजकीय समीकरणे बदलणार, अजितदादांचा भाजपला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

अभिषेक शर्मा मालिकावीर घोषित

भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला या मालिकेचा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आशिया कपनंतर सलग दुसऱ्यांदा अभिषेकला मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिषेकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 19, 68, 25, 28 आणि 23* धावा काढल्या. त्याने मालिकेतील पाच डावांमध्ये सर्वाधिक 163 धावा केल्या, एकदा नाबाद राहिले, 40.75 च्या सरासरीने आणि 161.38 च्या स्ट्राईक रेटने. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. त्याची 68 धावांची ही खेळी मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी होती.

follow us