IND vs AUS : पहिल्याच दिवशी रवींद्र जडेजावर बॉल टेम्परिंगचा आरोप
नागपूरः नागपूर कसोटी (Nagpur Test) चा पहिला दिवस संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘फॉक्स क्रिकेट’ चॅनलने (‘Fox Cricket’ Channel) रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जडेजा बोटावर कुठला तरी पदार्थ लावून बॉलिंग करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाच्या या कृतीचा संबंध बॉल टेम्परिंगशी जोडला आहे. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने जडेजावर अनेक सवाल उपस्थित केले
व्हिडिओत काय आहे?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 5 विकेट गमावून 120 धावा होती आणि जडेजा गोलंदाजी करत होता, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जडेजा हा बॉल घेऊन मोहम्मद सिराजकडे पोहोचल्याचे दिसत होते. यावेळी सिराजच्या हातातून जडेजानं काहीतरी घेतलं आणि ते बॉलिंगच्या करणाऱ्या बोटावर लावायला सुरुवात केली. जडेजाने बराच वेळ तो पदार्थ बोटांना लावला आणि त्यानंतर त्याने बॉलिंग केली. परंतु, या व्हिडिओमध्ये जडेजा तो पदार्थ बॉलला लावत असलेला कुठंही दिसत नाही.
मायकल वॉननेही प्रश्न उपस्थित केला
ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाच्या व्हिडिओवर बातमी चालवली आणि विचारले की सिराजने जडेजाला काय दिले? त्यांनी आपल्या बातमीत माजी कर्णधार मायकेल वॉनचे ट्विटही जोडले. वॉनने विचारले की, जडेजा त्याच्या बोटांना काय लावत आहे? यापूर्वी त्याने असे काही पाहिले नव्हते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार टिम पेननेही या व्हिडिओचे वर्णन ‘रंजक’ असे केले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं
जडेजाने बोटांना नेमकं काय लावले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जडेजाने सिराजकडून घेतलेली वस्तू बॉलवर लावल्याचे कुठेही दिसत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सांगितले की जडेजा वेदना कमी करण्यासाठी त्याच्या बोटावर बाम लावत आहे. त्याने कोणत्याही प्रकारे चेंडूशी छेडछाड केली नाही.