Video : अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंत उतरला मैदानात, चौकार, षटकारांच्या फटकेबाजीचा व्हिडीओ व्हायरल
Rishabh Pant: इंडियन क्रिकेट टिमचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. पंतला दुखापत झाल्यानंतर त्याला मैदानामध्ये पुन्हा येण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यातच आता पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पंत नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये (NCA) सराव सामन्यादरम्यान फलंदाजी करताना दिसत आहे.
Eknath Shinde : ‘नाराजी’ अन् ‘कोल्डवॉर’वर CM शिंदेंची डिनर डिप्लोमसी ठरणार गेमचेंजर
पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंत फलंदाजी करताना काही मोठे शॉट्स खेळताना दिसून आला आहे. पंतच्या या दमदार पुनरागमनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची प्रकृती ठिक होत असल्याचे त्याच्या दमदार खेळीवरुन दिसून येत आहे.
Rishabh Pant's batting practice, recovery has been excellent.
– Great news for Indian cricket. pic.twitter.com/KThpdkagDz
— Johns. (@CricCrazyJohns) August 16, 2023
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ऋषभ पंत मैदानात प्रवेश करण्यापूर्वी त्याने जमीनीला नमन करुन मैदानावर उतरला. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने खेळला. त्यावेळी पंतच्या चाहत्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याचे मनोबल वाढवताना दिसून आले.
नगरच्या कलाकाराची कलाकृती झळकणार थेट अयोध्येत, रामायणातील थ्रीडी मॉडेल साकारणार
वनडे वनडे वर्ल्डकपच्या आधी त्याचे पुनरागमनाची आशा नाही. मात्र 2023 अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी मात्र त्याचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेमध्ये त्याचे पुनरागमन झाले नाही तर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पंतचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यात इशान किशनला संधी देण्यात आली.
त्याचबरोबर इशान किशन आणि संजू सॅमसन मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी पार पडताना दिसले आहेत. मात्र एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून इशान किशनचा वरचष्मा मानला जातो. त्यामागे त्याचा अलीकडचा फॉर्म हेही मोठे कारण कारण आहे.