IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादचा मोठा निर्णय; कर्णधारपदी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची केली निवड

IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादचा मोठा निर्णय; कर्णधारपदी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची केली निवड

Aiden Markram SRH Captain : सनरायजर्स हैदराबाद संघाने (IPL 2023) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम (Aiden Markram) याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. (SunRisers Hyderabad) हैदराबाद संघाने (SRH) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स फ्रेंचायजीने विजेतेपद पटकावले होते.

SA20 स्पर्धेत सनरायजर्स ईस्टर्न कॅप संघाचं नेतृत्व एडन मारक्रम याच्याकडे सोपवण्यात आले होते. ६ संघात ही स्पर्धा रंगली होती. यामध्ये सनरायजर्स ईस्टर्न कॅप संघाची कामगिरी जबरदस्त होती. ६ संघामध्ये रंगलेल्या या सामन्यात मारक्रमच्या संघाने बाजी मारली. फायनल सामन्यात सनरायजर्स फ्रेंचाइजीने प्रिटोरिया कॅपिटल्सचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. SA20 मध्ये आपल्या संघाची कामगिरी बघता सनराजयर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये एडन मारक्रम याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

हैदराबादच्या कर्णधार पदाच्या शर्यतीमध्ये मारक्रमशिवाय भुवनेश्वर कुमार आणि मयांक अग्रवाल यांची देखील नावे चर्चेत होती. पण आज हैदराबाद संघाने ट्वीट करत मारक्रमला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू अल्पवधीतच भारतात प्रसिद्ध झाला. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्याने कर्णधारपदाचा अनुभवही आहे. तसेच तो विश्वचषक जिंकणारा एकमेव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. मार्करम याने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंडर १९ विश्वचषक जिंकून दिला होता.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

जाणून घ्या IPL च्या या संघाचे कर्णधार

सनरायजर्स हैदराबाद – एडन मारक्रम, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – फाफ डु प्लेसिस, चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी, कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर, पंजाब किंग्स – शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (दुखापतीमुळे यंदा दुसऱ्याकडे जबाबदारी जाऊ शकते), राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन, मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल, गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube