IPL 2026 पहिलाच सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ? आरसीबी भिडणार ‘या’ संघाशी  

IPL 2026 : टी 20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तिसऱ्यांदा जिंकली आहे. तर आता आयपीएलकडे क्रिकेट चाहत्यांचे

IPL 2026

IPL 2026 : टी 20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तिसऱ्यांदा जिंकली आहे. तर आता आयपीएलकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यासाठी 12 मार्च रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

या अपडेटनुसार आयपीएल 2026 चा पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम (M. Chinnaswamy Stadium) होणार आहे. आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात गतविजेता संघ आरसीबी सीएसकेशी (RCBvsCSK) भिडणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेता आणि लोकप्रिय संघ सीएसके दरम्यान होण्याची शक्यता आहे. तर या स्पर्धेचा दुसरा सामना उपविजेता पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) यांच्यात मुल्लानपूर येथे 29 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्च रोजी होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

मुंबईमध्ये कर्णधारांची बैठक

तर दुसरीकडे बीसीसीआयने फ्रँचायझींना कळवले आहे की, कर्णधार आणि प्रशिक्षकांसह वार्षिक बैठक 25 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. बैठकीचा अजेंडा नंतर शेअर केला जाईल असे बोर्डाने सांगितले. आगामी हंगामासाठी नियोजित प्रमुख बदलांवर सहसा या बैठकीत चर्चा केली जाते. बीसीसीआयने फ्रँचायझींना असेही कळवले आहे की, कर्णधारांचे फोटोशूट 15 मार्च रोजी नवी दिल्लीत होणार आहे.

follow us